esakal | भविष्यात राज्यातील जनतेच्या खिशाला कात्री लागणार; खुद्द मंत्रिमहोदयांनीच दिली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Anil-Parab

एसटी महामंडळ आधीच सहा हजार कोटीच्या संचिततोट्यात आहे. त्यासह वार्षीक तोटाही मोठा आहे. या परिस्थितीत उत्पन्न मिळवण्यासाठी एसटीकडे अनेक पर्याय सध्या विचारधीन आहे.

भविष्यात राज्यातील जनतेच्या खिशाला कात्री लागणार; खुद्द मंत्रिमहोदयांनीच दिली माहिती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळ आधीच सहा हजार कोटीच्या संचिततोट्यात आहे. त्यासह वार्षीक तोटाही मोठा आहे. या परिस्थितीत उत्पन्न मिळवण्यासाठी एसटीकडे अनेक पर्याय सध्या विचारधीन आहे. सध्या कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करणार नसून उत्पन्नवाढीच्या दृष्टीकोनातून भविष्यात भाडेवाढ हा सुद्धा एक पर्याय ठरू शकतो, अशी माहिती परिवहनमंत्री अॅड.अनिल परब यांनी 'सकाळ'ला दिली. 

मोठी बातमी ः ठाणेकरांनी साथ दिली तरच 15 दिवसात कोरोना आटोक्यात; आयुक्त सिंघल यांचा विश्वास 

गेल्या काही वर्षांमध्ये एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली. खासगी प्रवासी वाहतुकीने प्रवाशांना आकर्षीत केले आहे. त्याला स्पर्धा म्हणून आणलेल्या एसटीच्या शिवशाही बसगाड्यांचे वारंवार होणारे अपघात पाहता प्रवाशांनी त्याकडेही पाठ फिरवली. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. 

मोठी बातमी ः मुंबईहून नाशिकला गेलेल्या महिलेचे निधन; 20 सहप्रवाशांची रवानगी विलगीकरणात

दरम्यान, लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून एसटीची सेवा बंद आहे. त्यामुळे एसटीला दररोज सुमारे 22 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. अशा विचित्र परिस्थितीत एसटीला आता उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत निर्माण करावे लागणार आहे. त्यासाठी अनेक पर्याय पडताळून पाहत असून त्यामध्ये भाडेवाढ हा सुद्धा एक पर्याय असल्याचे परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

मोठी बातमी ः अखेर तारीख ठरली! राज्यात चित्रीकरणाला होणार लवकरच सुरुवात; मात्र....

दीडपट भाडेवाढीची शक्यता 
एसटी महामंडळाची तिजोरी रिकामी झाली आहे. आधीच तोट्यात असलेल्या महामंडळाला पुन्हा उत्पन्न मिळवून देण्यासाठी दीडपट भाडेवाढ करण्याचा एसटीचा प्रयत्न असल्याची चर्चा एसटीच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे. त्यामुळे भविष्यात भाडेवाढ झाल्यास सर्वसामान्य जनतेला भुर्दंड सोसावा लागण्याची शक्यता आहे.

loading image
go to top