esakal | मुंबईहून नाशिकला गेलेल्या महिलेचे निधन; 20 सहप्रवाशांची रवानगी विलगीकरणात
sakal

बोलून बातमी शोधा

death

लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या एका महिलेला महत्प्रयासाने नाशिकला घरी जाण्याची सोय झाली. मात्र, नाशिकला गेल्यावर श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तिने नजीकच्या डॉक्टरांना दाखवले.

मुंबईहून नाशिकला गेलेल्या महिलेचे निधन; 20 सहप्रवाशांची रवानगी विलगीकरणात

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या एका महिलेला महत्प्रयासाने नाशिकला घरी जाण्याची सोय झाली. मात्र, नाशिकला गेल्यावर श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तिने नजीकच्या डॉक्टरांना दाखवले. तिच्यातील लक्षणे पाहता तिला नाशिकला रवाना करण्यात आले. तिला कोरोनाचे निष्पन्न झाले. मात्र उपचारादरम्यान तिचे निधन झाले. त्यानंतर मात्र तिच्या सोबत प्रवास करणाऱ्या 20 जणांवर विलगीकरण कक्षात जाण्याची वेळ आली.

मोठी बातमी ः अखेर तारीख ठरली! राज्यात चित्रीकरणाला होणार लवकरच सुरुवात; मात्र....

घाटकोपरहून ही महिना भाजीच्या ट्रकमधून नाशिकला आली. देवळा येथे पोहोचल्यावर तिला काही वेळातच अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबियांनी तिला सटाणा येथील रुग्णालयात नेले. तिच्यातील लक्षणे पाहता तिला नाशिकला हलवण्यात आले. तिला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत लक्षात आले. 

मोठी बातमी ः लॉकडाऊनचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम; मुलांसह पालकांची चिडचीड वाढली

या 61 वर्षीय महिलेच्या दोन मुले तसेच सूनांनाही कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. तिची सुरुवातीस तपासणी केलेले डॉक्टर चाचणीत निगेटीव आले, पण देवळा येथे ती महिला ज्या दोघांना भेटली, त्यांना कोरोनाची लागण झाली. मुंबईहून भाजीच्या ट्रकमधून आलेल्या महिलेचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी वेगाने पसरली आणि तिच्यासह प्रवास केलेल्या अनेक जण तपासणीसाठी आले. त्यांना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे.

loading image