
महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन 5.0 मध्ये चित्रपट, मालिका आणि वेबसिरीजच्या चित्रीकरणाची परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून बंद असलेले चित्रीकरण काही नियम आणि अटी पाळून अखेर सुरू होणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन 5.0 मध्ये चित्रपट, मालिका आणि वेबसिरीजच्या चित्रीकरणाची परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून बंद असलेले चित्रीकरण काही नियम आणि अटी पाळून अखेर सुरू होणार आहे. याबाबत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (एफडब्ल्यूआईसीई)ने महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. याशिवाय एफडब्ल्यूआईसीईने येत्या 20 जूनपासून चित्रीकरण सुरू करणार असल्याचीही शक्यता वर्तवली आहे.
मोठी बातमी ः लॉकडाऊनचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम; मुलांसह पालकांची चिडचीड वाढली
एफडब्ल्यूआईसीईचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी चित्रीकरणास परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले असून 20 जूनपासून चित्रीकरण सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, ' चित्रीकरणास परवानगी दिल्याबद्दल एफडब्ल्यूआईसीईचे कर्मचारी आणि आमच्याशी जोडलेल्या पाच लाख कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचे खूप आभार मानतो. बऱ्याच दिवसांपासून काम बंद असल्याने आमचे कामगार अस्वस्थ झाले होते. लॉकडाऊनमुळे 80 टक्के कामगार आपल्या गावी परतले आहेत. मी राज्याचे सांस्कृतिक सचिव संजय मुखर्जी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. मी त्यांना सांगितले होते की, जर चित्रीकरणाची तारीख लवकर जाहीर न केल्यास 1 जूनपासून सुरू होणाऱ्या रेल्वे सेवेद्वारे इथे असलेले कामगार देखील त्यांच्या गावी निघून जाण्याची शक्यता आहे. हे सर्व महाराष्ट्र सरकारने लक्षात घेत सुरक्षा योजना आखून हा चांगला निर्णय घेतला आहे.
मोठी बातमी ः कोरोनापाठोपाठ लेप्टोच्या नियंत्रणासाठी पालिका सज्ज; 50 हजार उंदरांचा खात्मा
चित्रीकरणावेळी ही व्यवस्था अनिवार्य
31 मे रोजी सरकारने मनोरंजन क्षेत्रातील चित्रीकरण सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण काही अटी पाळून हे चित्रीकरण करण्यात येणार आहे. शिवाय कोरोनामुळे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर निर्मात्यांनी सेटवर डॉक्टर्स, नर्स आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे अनिवार्य असणार आहे.
मोठी बातमी ः आता काय बोलणार! सायन हायवेवर सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा
आम्हाला आशा आहे की, येत्या 20 जूनपासून चित्रपट, मालिका, वेबसिरीज आणि ऍड फिल्म्सचे चित्रीकरण सुरू होईल. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, सरकार आणि सर्व चित्रपटसृष्टीचे आभार मानतो.
- बी. एन. तिवारी, अध्यक्ष, एफडब्ल्यूआईसीई