
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेकडून चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांना बढती देण्याचा " प्रताप " एसटी महामंडळाने करून दाखवला आहे. याबरोबरच काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना राजकीय दबावापोटी महामंडळातील मोक्याच्या पदावर नियुक्त करण्याचा घाट देखील सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये अनेक आर्थिक व्यवहार झाल्याची देखील खमंग चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.