MSRTC Shivneri Expansion
ESakal
मुंबई
Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी
MSRTC Shivneri Expansion: एकेकाळी मुंबई-पुण्याची जीवनरेखा मानली जाणारी "शिवनेरी" बस सेवा आता संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारण्याच्या तयारीत आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी २०० नवीन व्होल्वो बस आणि स्लीपर कोच येण्याची घोषणा केली.
राज्य परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष यांची आधुनिक आणि आरामदायी "शिवनेरी" बस सेवा जी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेची शान आहे, ती आता संपूर्ण महाराष्ट्रात धावणार आहे. राज्य परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली. नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या २०० व्होल्वो बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.

