Thane News: नव्या ‘लालपरी’ची प्रतीक्षा, ७० नव्या बसची घोषणा कागदावरच; प्रवाशांचे हाल

Thane ST Corporation : ठाणे विभागात एसटी आगारांमध्ये गाड्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ST bus

ST bus

Esakal

Updated on

ठाणे शहर : दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या असून उन्हाळी सुट्ट्यांसोबतच गावोगावी जत्रांचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. अशा काळात ठाणे विभागातील एसटी आगारांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी उसळत आहे; मात्र एसटी महामंडळाकडे गाड्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिवहन मंत्रालयाकडून ठाणे विभागासाठी जाहीर केलेल्या ७० नव्या ‘लालपरी’ बस अद्याप ताफ्यात दाखल न झाल्याने प्रवाशांच्या पदरी निराशा पडत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com