
मुंबई : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ लवकरच उत्पन्नाचा नवा मार्ग शोधण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीमध्ये उतरणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त व्यावसायिक भागीदारीतून एसटी महामंडळ आपल्या जागांवर ‘पेट्रो-मोटेल हब’ उभारणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता एसटी आगारांमध्येही इंधन खरेदी करता येणार आहे.