

Devidas Road to S.V.P. Road connecting transferred to municipality
ESakal
मुंबई : उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पुढाकार घेतल्यानंतर बोरिवली (पश्चिम) येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘एमटीएनएल’ने देवीदास रोड ते एस.व्ही.पी. रोडला जोडणारा, १३.४० मीटर रुंद आणि सुमारे २०० मीटर लांबीचा रस्ता पालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे भगवती रुग्णालयाकडे जाण्यासाठीचा मार्ग विकसित करण्याचा मार्ग मोकळा आहे.