Book
Book

‘मु. पो. आई’ पुस्तकाचे उद्या मुंबईत प्रकाशन

मुंबई - पत्रकार संदीप काळे या संपादित आणि ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘मु. पो. आई- संपादकांचे मातृस्मरण’ या पुस्तकाचे मंगळवारी (ता. २३) प्रकाशन होत आहे. ग्रंथाली प्रकाशनचे विश्‍वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी ही माहिती दिली. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सायंकाळी ६ वाजता प्रकाशन सोहळा होणार आहे.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, राजदीप सरदेसाई, ‘सकाळ’चे संपादक संचालक श्रीराम पवार, अभिनंदन थोरात आदी उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी आपल्या आईच्या आठवणी आणि सर्व संपादकांच्या लेखांवर भाष्य केले आहे. 

राजदीप सरदेसाई, कुमार केतकर, भारतकुमार राऊत, श्रीराम पवार, ज्ञानेश महाराव, उत्तम कांबळे, राजीव खांडेकर, चंद्रमोहन पुपाला आदी संपादकांनी आईविषयी भावना मांडल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com