म्युकरमायकोसिसचे मुंबईत 100 हून अधिक मृत्यू

आतापर्यंत सहाशेहून अधिक रुग्णांवर मुंबईत उपचार,186 जणांना डिस्चार्ज
mucormycosis
mucormycosise sakal

मुंबई- पोस्ट कोविडमध्ये वेगाने पसरणाऱ्या म्युकरमायकोसिसमुळे (Mucormycosis) आतापर्यंत मुंबईत 100 हुन अधिक मृत्यूंची (Mucormycosis deaths) नोंद करण्यात आली आहे.मुंबईत एकूण 695 म्युकरमायकोसिसचे रुग्ण असून त्यात मुंबईतील 196 रुग्णांचा समावेश आहे. तर 499 रुग्ण मुंबई बाहेरचे आहेत. एकूण रुग्णांपैकी 113 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील 35 रुग्ण मुंबईतील तर 78 रुग्ण मुंबई बाहेरचे आहेत. आतापर्यंत 186 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील 45 जण मुंबईतील तर 141 जण मुंबई बाहेरील आहेत. (Mucormycosis people deaths number goes above 100 in mumbai it is spreading in human body quickly)

दरम्यान, म्युकरमायकोसिसमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत असून 16 जून या दिवशी मुंबई आणि मुंबईबाहेरील मिळून एकूण 98 मृत्यू होते पण, ही संख्या वाढून 113 वर पोहोचले आहेत. म्युकरमायकोसिस वेगाने शरीरात पसरतो. त्यामुळे त्याचा धोका अधिक असतो. लहान मुलांच्या तुलनेत मोठय़ांमध्ये या काळ्या बुरशीचे परिणाम लवकर दिसून येतात.

mucormycosis
सुपर स्प्रेडर्सपासून कोरोना रोखण्यासाठी BMC कडे प्लान तयार

मुंबईतील म्यूकरमायकोसिस स्थिर

मुंबईत सद्यस्थितीत 396 म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचार आहेत. 396 पैकी 97 केईएम रुग्णालयात, 56 जेजे रुग्णालयात, 43 नायरमध्ये, 19 बाॅम्बे, 23 ग्लोबल, 18 हिंदुजा, 19 कूपर, सायनमध्ये 18 रुग्ण दाखल आहेत. ही संख्या स्थिर झालेली दिसते.

मुंबईत 18 वर्षांखालील 4 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील 2 रुग्ण हे 16 वर्षांखालील आहेत. लहान मुलांना योग्य उपचार मिळावे यासाठी स्वतंत्र व्यवस्था करत आहोत,त्यासह लोकांमध्ये जनजागृती ही करण्यात येत आहे.

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका

एम्फोटेरोसिन बीचा मुबलक साठा

मुंबईत एम्फोटेरोसिन इंजेक्शनचा मुबलक साठा आहे. आतापर्यंत 4000 इंजेक्शनचा पुरवठा झाला आहे. 25 मे पासून पुरवठा केला जात आहे. सर्व रुग्णालयांना इंजेक्शन उपलब्ध करुन दिला जात आहे. 8 ते 12 आठवडे या आजारावर उपचार करावे लागतात. जास्त गंभीर रुग्ण नसल्याने आयसीयू, व्हेंटीलेटरची या रुग्णांना गरज भासत नाही. 30 टक्के लोकांची कान-नाक-घसा ची शस्त्रक्रिया केली गेली आहे. 40 टक्के रुग्णांची मेंदूची शस्त्रक्रिया केली गेली आहे. 30 टक्के लोकांची डोळ्यांची शस्त्रक्रिया केली गेली आहे.

- डाॅ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com