esakal | म्युकरमायकोसिसचा धोका वाढतोय; महिनाभरात २९८ नवे रुग्ण, ७४ जणांंचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

म्युकरमायकोसिसचा धोका वाढतोय; महिनाभरात २९८ नवे रुग्ण, ७४ जणांंचा मृत्यू

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची (corona third wave) चिंता सतावत असतानाच वाढणाऱ्या म्युकरमायकोसिसने (mucormycosis) त्यात आणखी भर घातली आहे. गेल्या दीड महिन्यात मुंबईत (Mumbai) या आजाराने ग्रस्त 298 रुग्णांची भर पडली (new mucormycosis patient) असून 74 जणांचा बळी (deaths) घेतला आहे.

हेही वाचा: वसईच्या कौशिक जाधव यांनी फळ-भाज्यांवर रेखाटले अष्टविनायक

म्युकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांची संख्या 918 वर पोहोचली आहे. त्यातील 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 551 रुग्ण बरे झाले असून 189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लामाची एकालाही बाधा झालेली नाही. एप्रिल,मे महिन्यात नियंत्रणात असलेला आजार आता वेगाने पसरत असल्याचे दिसते.

मुंबईत 13 जुलैला म्युकरमायकोसिसचे एकूण रुग्ण 620 तर 104 रुग्ण दगावले होते. त्यानानंतर 31 ऑगस्ट पर्यंत रुग्णांचा आकडा 918 वर पोचला तर 178 रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण आकडेवारी पाहिली तर केवळ दीड महिन्यात 298 रुग्णांची भर पडली तर 74 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या दीड महिन्यात म्युकर मायकोसिसचे रुग्ण 32 टक्के तर मृत्यूचा आकडा 40 टक्क्यांनी वाढला आहे.

सर्वाधिक रुग्ण असलेली शहरं

शहर एकूण रुग्ण

नागपूर 1536

पुणे 1368

औरंगाबाद 1331

मुंबई 918

सर्वाधिक मृत्यू झालेली शहरं

शहरं एकूण मृत्यू

पुणे 184

मुंबई 178

नागपूर 158

औरंगाबाद 115

loading image
go to top