
मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळाली. हिरेन मनसुखानी हे या कारचे मालक आहे. ते ठाणे येथे राहतात.
मुंबई: रिलायन्स ग्रुपचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर संशयास्पद स्कॉर्पिओ कार मिळाली. त्यात जिलेटीन सापडल्यामुळे गुरूवारी एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या मदतीने जिलेटीनच्या कांड्या सुखरुप बाहेर काढण्यात आल्या आहेत. दरम्यान संशयास्पदरित्या स्फोटक भरून आलेली गाडी ही विक्रोळी येथून चोरी झाली. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, हिरेन मनसुखानी हे या कारचे मालक आहे. ते ठाणे येथे राहतात.
विकास पाम, डॉ. आंबेडकर रोड ठाणे तीन हाथ नाका परिसरात राहणाऱ्या हिरेन मनसुखानी हे १७ फेब्रुवारीला मुंबईला यायला निघाले होते. ऐरोलीहून विक्रोळी मार्गे येताना, रस्त्यात गाडीचे स्टेअरिंग जाम झाल्याने त्यांनी गाडी विक्रोळी परिसरात सोडली. दुसऱ्या दिवशी गाडी घ्यायला गेले असता. गाडी नव्हती त्यामुळे गाडी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली.
काल रात्री टिव्हीवर गाडी पाहिल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी स्वत: पोलिसांना माहिती दिली. दरम्यान हिरेन यांना चौकशीसाठी मुंबई पोलिस आयुक्तालयात आणलं आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुकेश अंबानी यांना आलेलं धमकीचं पत्र जशाच्या तसं
ये तो सिर्फ ट्रेलर है
निता भाभी मुकेश भैया...फॅमिली येतो झलक है!
अअगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे पुरेसा मे लिखो उडाने के लिए . इंतजाम हो गया है!
संभल जाना
अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या कार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून एकूण 8 ते 10 पथक तयार करण्यात आली असून त्यांच्याकडून तपास करण्यात येणार अशी माहिती समोर आली आहे.
स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याने मुंबईतील सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. रात्री दहशतवादी विरोधी पथकही घटनास्थळी आले होते आणि सीसीटीव्ही ज्या दुकानातून मिळाला तिथून हार्डडिस्क ताब्यात घेण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीमही अंबानींच्या बंगल्याबाहेर तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचा- Mukesh Ambani: 'त्या' स्फोटकांमागे इंडियन मुझाहिद्दीनचा हात?
जप्त केलेल्या गाडीतून सुपर पावर डेझर एक्सप्लोजिव २५ एम एम * १२५ ग्रँम आणि
सोलर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या डो बाजारगाव नागपूर असे लिहिलेल्या १९ कांड्या तसंच
बनावट नंबर प्लेट मिळाल्या आहेत.
Mukesh Ambani Antilia House explosives green Scorpio Car owner