अंबानी स्फोटके प्रकरण : जैश उल हिंदच्या नावाने आलेल्या टेलिग्राम मेसेजचं लोकेशन समजलं

अंबानी स्फोटके प्रकरण : जैश उल हिंदच्या नावाने आलेल्या टेलिग्राम मेसेजचं लोकेशन समजलं

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याची जबाबदारी स्वीकारणारा जैश उल हिंद या संघटनेच्या नावाने आलेला टेलिग्राम संदेश हा तिहार कारागृह परिसरातून आल्याचे सायबर तपासणीत निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलिस सूत्रांनी याबाबतची माहिती दिली. या संदेशात खंडणीसाठी दिलेली बिटकॉइनची लिंकही अस्तित्त्वात नसल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

पिक्चर अजून बाकी आहे, अशा शब्दात या संघटनेच्या वतीने जारी करण्यात आली होती.  एका टेलिग्राम मेसेजच्या माध्यमातून जैश उल हिंदने दावा केला होता. त्यात स्फोटकं ठेवणारे दहशतावदी सुखरुपपणे घरी पोहोचले आहेत. हा केवळ ट्रेलर होतो आणि पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे.

यात मुकेश अंबानी यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी देण्यात आलेली बिटकॉइनची लिंकच बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते.  या संदेशानंतर सायबर तज्ज्ञांच्या मदतीने या टेलिग्राम संदेशाची तपासणी करण्यात आली असून तो तिहार कारागृह व आसपासच्या परिसरातून पाटवण्यात आल्याचे तांत्रिक तपासणीत निष्पन्न झाले आहे.

या संदेशानंतर संघटनेच्या वतीने या प्रकरणातील सहभागाचे खंडन करणारी पोस्ट वायरल झाली होती. त्यात आपलं हे कृत्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे याच जैश उल हिंदने दिल्लीत इस्त्रायल दुतावासाबाहेर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पण पुढे याप्रकरणी तपास करणाऱ्या  दिल्ली पोलिसांनी याप्रकरणामागे दहशतवादी हात नसल्याचे म्हटले होते.

संशयीत कार सापडल्याचा दावा करण्यात येत असला, तरी पोलिसांकडे याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. दरम्यान स्कॉर्पिओ कारसह अंबानी यांच्या घराजवळ आलेली संशयीत इनोव्हा कार पालघर जिल्ह्यातून एनआयएला सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. ती तपासणीसाठी एटीएस कार्यालयात आणण्यात आली होती. पण एटीएसच्या अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

mukesh ambani bomb scare location of telegram message traced and confirmed by investigation agencies

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com