esakal | 'त्या' दिवशीही निश्चिंत बसून वाझे खात होते सॅडविच, ATS अधिकाऱ्याने सुनावले खडेबोल
sakal

बोलून बातमी शोधा

'त्या' दिवशीही निश्चिंत बसून वाझे खात होते सॅडविच, ATS अधिकाऱ्याने सुनावले खडेबोल

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकानं भरलेली गाडी आढळून आली.  सचिन वाझे घटनास्थळाजवळ निश्चिंत सॅडविच खात होते, अशी माहिती समोर आली आहे.

'त्या' दिवशीही निश्चिंत बसून वाझे खात होते सॅडविच, ATS अधिकाऱ्याने सुनावले खडेबोल

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई:  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकानं भरलेली गाडी आढळून आली. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. अँटीलियाजवळ ज्या दिवशी स्फोटकं सापडली. त्या दिवशी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे घटनास्थळाजवळ निश्चिंत सॅडविच खात होते, अशी माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यावर एटीएसचा एक मोठा अधिकारी घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळावर पोहोचताच अधिकाऱ्यानं वाझेंना घटनेसंबंधी विचारणा केली. मात्र वाझेंनी त्या अधिकाऱ्याकडे कानाडोळा केला. त्यावेळी वाझे सॅडविच खाण्यात मग्न राहिले आणि पोलिस हवालदाराला साहेबांना गाडी दाखव असं सांगत अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. 

पोलिस खात्यातील कोणताही प्रोटोकॉल न पाळता वाझे यांच्या या वागण्यावरून या अधिका-याचं वाझेंसोबत वादही झाला. त्यानंतर ATS अधिकाऱ्याने वाझेंना खडेबोल सुनावले. त्याच्या या वागण्याची तोंडी तक्रार या अधिकाऱ्याने वरिष्ठांनाही केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सचिन वाझे यांचं निलंबन 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचे पोलिस दलातून पुन्हा एकदा निलंबन करण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके आढळल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली. त्यानंतर त्यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात आले. वाझे हे १७ वर्षांपूर्वीही ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरणात निलंबन झाले होते.

हेही वाचा-  माजी मुख्यमंत्री अडचणीत, कुटुंबीयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच

सचिन वाझे हे सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. पण मुकेश अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी  संशयित असलेल्या वाझेंना अटक करण्यात आली आहे.

Mukesh Ambani Explosives Sachin Waze was eating sandwiches ATS officer Shouted

loading image