esakal | माजी मुख्यमंत्री अडचणीत, कुटुंबीयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच
sakal

बोलून बातमी शोधा

माजी मुख्यमंत्री अडचणीत, कुटुंबीयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच

एचडीआयएलचे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान बँक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने ही कारवाई केली.

माजी मुख्यमंत्री अडचणीत, कुटुंबीयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. राज श्रॉफ आणि त्यांची पत्नी प्रीती श्रॉफ यांच्या मालकीच्या जिंदाल कंम्बाईन्स प्रा. लि. आणि ऑरलँडो ट्रेडींग प्रा.लि. शी संबंधीत 35 कोटी 48 लाखांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) टाच आणली आहे. एचडीआयएलचे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान बँक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने ही कारवाई केली.

टाच आणलेल्या मालमत्तेमध्ये अंधेरी येथील कालेंडोनिया इमारतीतील दोन व्यावसायिक मालमत्ताचा समावेश आहे. या मालमत्ता प्रत्येकी 10 हजार 550 चौ.फूट असल्याचे अधिका-याने सांगितले. एचडीआयएल प्रकरणातील तपासात येस बँकेने 200 कोटी रुपये मॅकस्टार मार्केटींगला दिले होते, असे निष्पन्न झाले होते.

हेही वाचा- म्हणून बनावट नंबर प्लेट प्रकरणी CIU अधिकाऱ्यांची होतेय चौकशी

ही रक्कम ज्या कामासाठी घेण्यासाठी नाही. तिथे न वापरता इतर कामासाठी वापरून व्यवहारात आणल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी सखोल तपासानंतर या मालमत्तांवर टाच आणण्यात आली. त्यातील एक व्यावसायिक  मालमत्ता 2014 मध्ये जिंदाल कॉम्बाइन्स प्रा. ला 9 कोटी 39 लाखाला (त्या वेळी  रेकनर मूल्य 15 कोटी 64 लाख रुपये) आणि 2016 मध्ये ऑरलँडो ट्रेडिंग प्रायव्हेटला आणखी एक व्यावसायिक मालमत्ता 18 कोटींना ( रेकनर मूल्य 19 कोटी 84 लाख ) हस्तांतरित करण्यात आली होती, असं ईडी सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा- रियाच्या अडचणीत वाढ; जामिनाविरोधात NCB सर्वोच्च न्यायालयात

त्यातील केवळ दुसऱ्या मालमत्तेचे 10 कोटी रुपये स्विकारण्यात आले आहे. या दोन्ही मालमत्ता कंपन्यांना वर्षाकाठी अनुक्रमे 1 कोटी 76 लाख आणि 1 कोटी 39 लाख रुपये भाडे मिळत आहे.  या दोन्ही कंपन्या राज श्रॉफ आणि त्यांची पत्नी यांच्या मालकीच्या आहेत. अशा प्रकारे राकेश वाधवन आणि सारंग वधवन यांनी मॅक स्टार मार्केटिंग प्रा. लि. बहुसंख्य भागधारकांच्या (डीई शॉ ग्रुपमध्ये  83.66% समभाग असलेल्या) संमतीविना वरील मालमत्ता बेकायदेशीरपणे कमी किमतीत विकून मॅक स्टारचे नुकसान केल्याचं ईडी सूत्रांनी सांगितले. यापूर्वी याप्रकरणी ईडीने 34 कोटी 36 लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली होती आणि आता 35 कोटी 48 लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणल्यामुळे याप्रकरणी एकूण 64 कोटी 84 लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Enforcement Directorate immovable assets Sushil Kumar Shinde daughter

loading image