

Mulund BEST Bus Driver
ESakal
मुंबई : मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील अत्यंत गजबजलेल्या एमजी रोडवर बेस्ट बसचालकाच्या मुजोरीचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 'शेवपुरी'चे पार्सल घेण्यासाठी चालकाने बस भररस्त्यात २० मिनिटांहून अधिक काळ थांबवून ठेवली, परिणामी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांचा खोळंबा झाला.