मुंबई : मुलुंड परिसरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर तिचे स्वतःचे वडील, दोन भाऊ आणि एका ओळखीच्या व्यक्तीने तब्बल ११ महिन्यांपर्यंत लैंगिक अत्याचार (Mumbai Minor Sexual Abuse Case) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी (Mulund Police) पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Acts) गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली असून एका अल्पवयीन आरोपीला बालगृहात पाठविण्यात आले आहे.