चोरी केलेल्या बाईकचा फोटो फेसबुकवर पोस्ट करणं पडलं महागात, दोघा भावांना अटक

पूजा विचारे
Wednesday, 7 October 2020

एक चोरट्यानं चोरी केलेल्या बाईकचा फोटो फेसबुकवर अपलोड केला आणि हीच चूक त्याला चांगलीच महागात पडली. हा पोस्ट चोरट्यानं फेसबुकवर अपलोड केल्यानं हा चोरटा पोलिसांच्या ताब्यात मिळाला आहे. नवघर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

मुंबईः एक चोरट्यानं चोरी केलेल्या बाईकचा फोटो फेसबुकवर अपलोड केला आणि हीच चूक त्याला चांगलीच महागात पडली. हा पोस्ट चोरट्यानं फेसबुकवर अपलोड केल्यानं हा चोरटा पोलिसांच्या ताब्यात मिळाला आहे. नवघर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत बाईक चोर आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. 

राहुल गायकवाड आणि त्याचा भाऊ समीर गायकवाड अशी बाईक चोरांची नावं आहेत. ही चोरी मुलुंड येथे घडली असून दोघांची चौकशी सध्या पोलिस करत आहेत. 

अधिक वाचाः  रियाचा पाठलाग करु नये; नाहीतर कारवाई अटळ, मुंबई पोलिसांच्या सूचना

गेल्या महिन्यातल्या १९ सप्टेंबरला मुलुंडच्या हरिओम नगर परिसरात असलेल्या आदित्य पार्क या इमारतीतून एक बाईक चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांनी मिळाली होती. या इमारतीत दोन रेनकोट घालून आलेल्या व्यक्तीनी बाईक चोरल्याचं सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना सापडलं होतं. पोलिसांना इमारतीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं, मात्र त्यातून चोरट्यांची ओळख पटत नव्हती. आता चोरट्यांनी प्रकाश कुबल यांची बाईक चोरल्याची कबुली दिली आहे.

हेही वाचाः  अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

तक्रार केल्यानंतर तक्रारदारांनं ज्यांच्यावर संशय आहे त्या व्यक्तींची नावे पोलिसांना कळवली होती. त्याच संशयितांपैकी राहुल गायकवाडनं आपल्या फेसबुक पेजवर चोरी केलेल्या बाईकसह स्वतःचा फोटो अपलोड केला होता. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी राहुल गायकवाड याला अटक केली. चोरट्यांकडून ही दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे.

Mulund Thief Posted Picture theft bike Facebook Two brothers arrested


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mulund Thief Posted Picture theft bike Facebook Two brothers arrested