Mumabai : मुंबईत दोन ठिकाणी भाजप-युतीचा जनआक्रोश आंदोलन, ठाकरे गटाच्या मोर्चाला भाजपचे प्रत्युत्तर

यावर पांघरून घालण्यासाठी त्यांचा मोर्चा आहे.
Protest
Protestesakal

Mumbai - ठाकरे गटाचा उद्या निघणारा मोर्चा म्हणजे 'चोर मचाये शोर' असा प्रकार असून स्वतःची पापे लपवण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून महायुतीतर्फे नरीमन पाईंट आणि दादरच्या स्वामीनारायण मंदिर परिसर या दोन ठिकाणी जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Protest
Pune accident news : पुण्यात मिनी बसचा स्टेअरिंग रोड तुटल्याने अपघात सुदैवाने नऊ जण बचावले

ठाकरे गटाने २५ वर्षांत मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घातला आहे. कोविड काळातील झालेल्या घोटाळ्याचा आम्ही मुंबईकरांतर्फे हिशोब मागत आहोत. 'चोर मचाये शोर' असा उबाठा गटाचा मोर्चा आहे. स्वतः केलेला भ्रष्टाचार उघडा पडायला लागला आहे. जवळच्या लोकांची चौकशी होत आहे.

Protest
Mumbai Rain Update : मागाठाणे मेट्रो स्थानकाला कोणताही धोका नाही; महामुंबई मेट्रो

यावर पांघरून घालण्यासाठी त्यांचा मोर्चा आहे. या आंदोलनाला अजून तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा दिला नसल्याचा टोला शेलार यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात एसआयटी घोषित केली. त्यावेळी मोर्चा घोषीत केला. त्यामुळे त्यांना मुंबईकरांशी काहीही घेणे देणे नसल्याची टीका शेलार यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com