Mumbai Water Supply: मुंबईतील धरणातील जलसाठा ८८ टक्क्यांवर, १० टक्के पाणीकपात कधी संपणार? महत्त्वाची माहिती समोर

Mumbai Dam Water Level: मुंबईतील पावसामुळे धरणातील जलसाठा ८८ टक्क्यांवर उपलब्ध झाला आहे. मात्र तरीही शंभर टक्के होईपर्यंत पाणीकपात कायम राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Dam Water Level

Mumbai Dam Water Level

ESakal

Updated on

मुंबई : जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये ८८.४९ टक्क्यांवर जलसाठा उपलब्ध झाला आहे. पाच-सहा दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात तुरळक सरी पडत आहेत. दरम्यान, एल निनोच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तुरळक सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शंभर टक्के जलसाठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत १० टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे जलअभियंता विभागाने सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com