esakal | मुंबई: काशी मिरा येथे एक हजार किलो 'गोमांस' जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई: काशी मिरा येथे एक हजार किलो 'गोमांस' जप्त

मुंबई: काशी मिरा येथे एक हजार किलो 'गोमांस' जप्त

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भाईंदर: मिरा रोड येथे विक्रीसाठी आणलेले सुमारे एक हजार किलो गोमांस काशी मिरा पोलीसांनी जप्त केले आहे. हे गोमांस मालेगावमधून टेम्पोने मिरा रोड येथे आणले जात होते. मिरा रोड येथे टेम्पोद्वारे गोमांस आणले जाणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी पहाटे पोलीसांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सनराईज हॉटेल जवळ टेम्पो अडवला.

हेही वाचा: कल्याणमध्ये डॉक्टरांच्या संघटनेकडून पुरस्कार देऊन शिक्षकांचा गौरव

त्यात सुमारे तीन लाख रुपये किंमतीचे एक हजार किलो गोमांस आढळले. मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रम निराटले यांनी त्याचे तीन नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. काशी मिरा पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, टेम्पोचालक अमीर मुनाफ शेख याच्यासह तीन जणांना अटक केली आहे.

loading image
go to top