
मुंबई लोकलच्या इतिहासातील काळा दिवस ठरलेल्या ११ जुलैच्या साखळी बॉम्ब स्फोटातील सर्व आरोपींची उच्च न्यायालायाने निर्दोष मुक्तता केली आहे. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटाची आठवण करुन देणाऱ्या साखळी स्फोटामध्ये २०९ लोकांचा बळी गेला. या साखळी बॉंबस्फोटाप्रकरणी 13 आरोपींना शिक्षा झाली होती. बॉंबस्फोटाच्या काळ्या दिवसापासून ते पुराव्यांअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता होण्यापर्यंत नेमकं काय काय घडलं ते जाणून घेऊया.