Mumbai : २३८ एसी लोकलच्या अडथळा दूर

एसी लोकल गाड्या चालविण्याचे धोरण ठरणार
Mumbai
Mumbai esakal

मुंबई : भविष्यात मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर २३८ एसी लोकल दाखल होणार आहे. त्यामुळे पारंपारिक लोकलमधून प्रवाशांना वातानुकूलित लोकलमध्ये योग्य पद्धतीने स्थलांतरित करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय़ गेल्या वर्षी घेतला होता. त्यानुसार, एका खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. कंपनीने सर्वेक्षण अहवाल एमआरव्हीसीकडे सुपूर्द केले आहे. आता अहवाल चर्चा करून पुढील २३८ एसी लोकल संदर्भात पुढील रूपरेषा आखण्यात येणार आहे.

Mumbai
Parenting Tips: या Vitamin च्या कमतरतेमुळं मुलांची स्मरणशक्ती होते कमकुवत, पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पात (एमयूटीपी) मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी एकूण २३८ वातानुकूलित लोकल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यात एमयूटीपी-३ मधील ४७ आणि एमयूटीपी-३ अ मधील १९१ वातानुकूलित लोकलचा समावेश आहे. परंतु, २०१९ पासून राज्य सरकारकडून प्रतिसाद नसल्याने प्रकल्प रखडला होता. राज्यात शिंदे फडणवीसची सत्त्ता आल्यानंतर राज्य सरकारने सुधारित प्रकल्पसंचाला अर्थसहाय्य उभारण्यासाठी मंजूरी देण्यात आली .

Mumbai
Career Tips: लहान मुलांच्या सहवासात राहायला आवडत असेल तर या क्षेत्रात करा करिअर

त्यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणीच्या प्रक्रियेला अधिक चालना मिळाली आहे. एमयूटीपी-३ आणि एमयूटीपी-३ अ मधील एकूण २३८ वातानुकूलित लोकल बांधण्याचा मार्ग मोकळा झालेला होता. तसेच मुंबई उपनगरीय रेल्वेचे संपूर्ण वातानुकूलित करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळ गेल्या वर्षीपासून कामाला लागली आहे. पारंपारिक लोकलमधून प्रवाशांना वातानुकूलित लोकलमध्ये योग्य पद्धतीने स्थलांतरित करण्यासाठी गेल्या वर्षी एका खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. ह्या कंपनीकडून प्रवाशांचे सर्वेक्षण गेल्या वर्षभरापासून सुरु होते. अखेर हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आपला अहवाल एमआरव्हिसीकडे सादर केला आहे.

Mumbai
Travel Tips : ग्रुपसोबत ट्रीपला जाताना ‘या’ छोट्या-मोठ्या गोष्टी लक्षात ठेवा

या अहवालात आलेल्या शिफारस -

- एसी लोकल मधील आसन व्यवस्थेची पुनर्रचना करणे,

- सध्याच्या १३ टक्यांवरुन १९टक्यांपर्यत जागा वाढविणे,

- स्वतंत्र मालडब्बाची मागणी

- एसी लोकल थांबण्याच्या वेळेत वाढ

- एसी लोकल तिकिट दरात कमी

- महिलांसाठी आरक्षित जाग २३ टक्के पेक्षा जास्त करणे

- एसी लोकलची फ्रिक्वेसी वाढविणे

Mumbai
Baby Care Tips : हिवाळ्यात बाळाची मालिश करण्यासाठी 'या' तेलांचा करा वापर, बाळ राहील तंदूरूस्त

एसी लोकलला कमी थांबे द्या !

अहवालानुसार, किमान २४ टक्के गाड्या जलद मार्गावर धावतात. एसी लोकलमध्ये दरवाजा उघडण्याची/बंद होण्याची वेळ सुमारे ६ ते १० सेकंद आहे. एसी लोकलने धीम्या मार्गावर ३८ते ४० सेकंदांचा थांबा घेणे आवश्यक आहे. साधी लोकल ३० सेकंद थांबते. तसेच एसी लोकलला कमी थांबे देण्यात यावेत अशीही शिफारस केली आहे.

कंपनीने सर्वेक्षण अहवाल एमआरव्हीसीकडे सुपूर्द केले आहे. सर्वेक्षण अहवाला आलेल्या शिफारसी विचार करून आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर, एसी लोकल गाड्या कशा चालवायच्या याबद्दल एमआरव्हीसी धोरण ठ्वरविणार आहे. परंतु, येणाऱ्या एसी लोकल ह्या वंदे मेट्रो असणार आहे. त्यामुळे वंदे मेट्रो कशी असणार यांदर्भात एमआरव्हीसी अभ्यास करणार असल्याची माहिती एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com