

CSMT Terminus Security
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानमधून आलेल्या अतिरेक्यांनी मुंबईवर केलेल्या भीषण हल्ल्याला आज १७ वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही लक्ष्य केले गेले होते. या हल्ल्यात ५८ जणांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. तेव्हापासून प्रशासनाने रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवण्याचा गाजावाजा केला. आधुनिक स्कॅनर, डोअर मेटल डिटेक्टर आणि कठोर तपासणी यंत्रणा लावल्याचे जाहीर करण्यात आले; पण या सर्व गोष्टी आज कागदावरच राहिल्याचे चित्र समोर येत आहे.