मुंबई : मुंबईत एका संगीत कार्यक्रमात धक्कादायक घटना घडली आहे. वरळी डोम येथे कार्यक्रमात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ उडाली. .मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एनएससीआय वरळी डोम येथे एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वृषभ महेंद्र गांगुर्डे (२८) असे मृत तरुणाचे नाव असून हा माहिम परिसरातील रहिवासी आले. वरळी डोम येथील म्युझिक कॉन्सर्टमध्ये हा तरुण त्याच्या मित्र-मैत्रिणींसोबत आला होता..Mumbai Local: कामाच्या दिवशी लोकलचा मेगाब्लॉक! दोन दिवस रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार; नियोजन करून घराबाहेर पडण्याचं आवाहन .यावेळी वृषभने त्याच्या मित्रांसोबत मद्यपान केले. त्यानंतर या कार्यक्रमादरम्यान वृषभ आणि त्याच्या एका मैत्रिणीला अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वृषभ याचा मृत्यू झाला असून त्याच्या मैत्रिणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे..दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुंबई पोलीस दाखल होत त्यांनी घटनेच्या परिस्थितीची चौकशी सुरू केली. सध्या तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नसून या घटनेत कोणत्या बाह्य घटकांचा हात होता का, याचेही पोलीस शोध घेत आहेत..पोलीस सध्या या घटनेप्रकरणी उपलब्ध पुराव्यांची तपासणी करत असून, घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्ती आणि साक्षीदारांकडून माहिती गोळा करत आहेत. त्याचबरोबर शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक अहवालांमध्ये तरुणाच्या मृत्यूचे कारण समोर येण्याची अपेक्षा आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे..Mumbai: मुंबईतील रुग्णांसाठी खुशखबर! आता कमी दरात औषधं मिळणार; जेनेरिकसोबत ब्रँडेड औषधांवरही सवलत.जुन्या वादातून चाकूने हल्लादहावीचा निकाल घेऊन घरी परतणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्यांवर जुन्या वादातून चाकूने हल्ला झाल्याची घटना दहिसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी बापलेकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हनीफ साबीर शेख (वय १७) हा मंगळवारी (ता. २) दहावीचा निकाल घेऊन परतत असताना मेहफुस शेख याचा त्याला फोन आला. मेहफुसने त्याला दहिसर येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार हनीफ हा त्याचा मित्र शेहबाज इमरान खानसोबत ठरलेल्या ठिकाणी गेला. तेथे मेहफुस आणि त्याचे दोन मित्र उपस्थित होते. तक्रारीनुसार त्याचवेळी मेहफुसचे वडील मेहबुब शेख घटनास्थळी आले आणि त्यांनी हनीफचे दोन्ही हात पकडून धरले. त्यानंतर मेहफुसने धारदार हत्याराने हनीफच्या छाती आणि पोटावर वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.