
मुंबई : मुंबईत मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. एफ उत्तर विभागातील जीटीबी नगर रेल्वे स्थानक ते प्रतिक्षा नगर डेपो या अवघ्या २ किमी रस्त्यावर तब्बल ३०० खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल तर होतच आहेत, पण पावसाळ्यापूर्वी सज्जतेचा दावा करणाऱ्या पालिकेचे पितळ उघडे पडले आहे.