New Year 2021: नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या स्वागतासाठी मुंबई पोलिस सज्ज

New Year 2021: नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या स्वागतासाठी मुंबई पोलिस सज्ज

मुंबई: नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अबाल-वृद्धासह संपूर्ण तरूणाई सज्ज झाली आहे. यादरम्यान कोणताही अनुचित पकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 5 जानेवारीपर्यंत रात्री11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.  त्यासाठी मुंबई पोलिस, वाहतूक पोलिस कर्मचारी, राज्य राखीव दल आणि केंद्रीय औद्योगिक बलाचे जवान तैनात करण्यात येणार आहे.

31 डिसेंबरच्या दिवशी सर्व पोलिस अधिकारी-कर्मचा-यांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्यात.  या दिवशी 30 हजारहून अधिक पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ तैनात राहणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अथवा सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत.

अशावेळी शहरातील विविध रेल्वे स्थानके महत्वाची मंदिरे, तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी साध्या वेशातील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे. जेणेकरुन, याप्रसंगी दोन गटात अथवा टवाळखोरांमध्ये वादविवाद होण्याच्या घटना घडत असतात. तसेच या घटनांना वेळीच आवर घालता यावा याकरीता पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

छेडछाडीवर विशेष लक्ष

नवीन वर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक तरूणी आणि महिला तसेच अल्पवयीन मुली देखील बाहेर पडणार आहे. मात्र नेमके यादरमयान मद्याच्या नशेत असलेल्या तळीरामांकडून या महिलांची छेडछाड अथवा विनयभंगसारख्या घटना होऊ नये, याकरीता प्रत्येक पोलिस ठाण्याला आदेश देण्यात आले आहेत. यादरम्यान महिला तसेच लहान मुलांची या छेडछाड होणार नाही याकडे पथकांचे लक्ष राहील.
  
ड्रोनचा वापर

नववर्ष स्वागतानिमित्त 30 डिसेंबरला संध्याकाळपासूनच रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, वरळी सी फेस, बँडस्टँड, जुहू चौपाटी या ठिकाणी उसळणारी गर्दी लक्षात घेऊन बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस ड्रोनचा वापर करणार असून किनाऱ्यावरील गस्तीसाठी पोलिस स्पीड बोटीचा वापर करणार आहेत. या ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

तळीरामांवर वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांची करडी नजर

दरम्यान, 31 डिसेंबरच्या रात्री अनेकजण हे मद्याच्या नशेत मश्गुल असतात. नेमके अशाचवेळी हे सर्वजण रात्रीच्या वेळी नाईट राऊंडला निघत असतात. यामुळे भरधाव गाड्या चालवून, तसेच मद्याच्या नशेत असलेल्या तळीरामावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली आहे. यादरम्यान ब्रेथ अॅनालयाझर्सच्या साह्याने या तळीरामांची पोलखोल करीत, त्यांच्या दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास वाहतूक पोलिस कर्मचारी सज्ज झाले आहेत.

31 डिसेंबरसाठी काहीजण बोट पार्टीचे आयोजन करतात. मात्र 26/11 हल्ल्यानंतर सतर्क झालेल्या मुंबई पोलिसांनी गेल्या आठ वर्षापासून 31 डिसेंबरला एकाही बोट पार्टीला परवानगी दिली नाही. यामुळे या वर्षीही बोट पार्टीला परवानगी देण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

गृहविभागाच्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

  • कोरोनाच्या अनुषंगाने 31 डिसेंबर 2020ला दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि दि. 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.
  • 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
  • विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी आणि दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
  • नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
  • नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
  • फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
  • कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत आणि पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
  • तसेच या परिपत्रकानंतर 31 डिसेंबर 2020 आणि नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai 35 thousand policemen eight drones tight security december 30 and 31

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com