Mumbai:मिठी नदीसाठी यंदा 654 कोटीचे पॅकेज

मिठी नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून नदीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून मिठी नदीची धारण क्षमता दुपटीने आणि वहन क्षमता तीन पटीने वाढल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
मिठी नदी
मिठी नदीsakal

मुंबई - मिठी नदीची भूख अजूनही भगत नाही. २६ जुलै २००५ साली झालेल्या प्रलयानंतर मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण आणि गाळ काढण्याच्या कामावर पालिकेने कोट्यवधी रुपये आतापर्यंत खर्च केले आहेत. अजूनही मिठीची कामासाठी पॅकेजवर पॅकेज काढले जात आहेत. यंदाच्या २०२३- २४ च्या अर्थसंकल्पात मिठीच्या विविध कामांसाठी आणखी ६५४ कोटी पॅकेजची तरतूद करण्यात आली आहे.

मिठी नदी
Pune Politics News : पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार का? रवींद्र धगेंकरांनी दिलं उत्तर

मिठी नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून नदीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून मिठी नदीची धारण क्षमता दुपटीने आणि वहन क्षमता तीन पटीने वाढल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

आता नव्या अर्थसंकल्पात नदीच्या विकासाचा आणि नदीचा प्रदुषण नियंत्रण आराखडा तयार करण्यात आला असून त्याची चार पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाचा कहर सुरु झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात मिठी नदीच्या विकासाचे काम ठप्प झाले होते आता या कामाला वेग देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मिठी नदी
Mumbai : आता तरी शहाणे व्हा,15 दिवसांत निर्णय घ्या आमदार पाटील यांचा पालिका प्रशासनाल इशारा

असे आहे यंदासाठी पॅकेज

पॅकेज १ - मिठीच्या पवई ते फिल्टर पाड्यापासून इंटरसेफ्टर चे बांधकाम, मलनिसारण वाहिन्या टाकणे, मलजल प्रक्रिया केंद्र - १३३ कोटी

पॅकेज २ - अंतर्गत भिंत, सेवा रस्ता, पवई ते सीएसटी रोड कुर्ला मलनिसारण वाहिन्या टाकणे - ५७० कोटी

पॅकेज ३ - संरक्षक भिंत, फ्लड गेट, पंपिंग यंत्रणा, पवई ते सीएसटी रोड पूल, कुर्ला, मलनिसारण वाहिन्या - २१५६ कोटी

पॅकेज ४ - बापट नाल्यापासून सफेदपूल नाला ते घाटकोपर मलजल प्रक्रिया केंद्रापर्यंत बाेगद्याचे बांधकाम - ४५५ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com