
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत ११,६२,५६५ दक्षलक्ष लिटर इतका म्हणजेच ८० टक्केपेक्षाही जास्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा जलसाठा हा पुढील २८८ दिवस म्हणजेच पुढील २९ एप्रिल २०२६ पर्यंत पुरेल इतका असल्याची माहिती पालिकेच्या जलाभियंता विभागाने दिली आहे.