
Mumbai Local Train : मुंबई लोकल हा विषय अत्यंत गंभीर असून दररोज करोडो लोक या लोकल रेल्वेतून प्रवास करत असतात. इथं मोठ्या प्रमाणावर फुकटात प्रवास करण्यांची समस्या मोठी असून त्यासाठी तिकीट तपासणीस अर्थात टीसींची कामगिरी महत्वाची ठरते. पण बऱ्याचदा हे टीसी इतर रेल्वे कर्मचाऱ्यांना फुकटात प्रवास करण्यास प्रोत्साहन देताना दिसतात. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यामध्ये वातानुकुलीत डब्यातून अधिकृत तिकीट काढलेल्या प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही कारण इथं रेल्वेचे कर्मचारी फुकटात बसून प्रवास करत असतात. याची जागेवरच तक्रार केल्यानंतर एका टीसीनं उलट प्रवाशावरच दादागिरी केल्याचं दिसून येत आहे. तर संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याला मात्र त्यानं कुठलाही दंड न आकारता सोडून दिलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.