मुंबई : मुंबईत रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai Rains) शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. सोमवारी सकाळी शहरातील विविध भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर एसी लोकलच्या डब्यातून पाणी गळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नागरिक आणि प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.