Mumbai : खोपोलीतील भीषण अपघातामुळे गोरेगावात पसरली शोककळा

बहुतेक मुलं ही गोरेगावात राहणारी आहेत. या पथकात खोपोलीतील २ मुलं होती त्यांना उतरवण्याकरिता बस त्या मार्गावर गेली होती तिथे हा भीषण अपघात झाला. या पथकात किशोरवयीन मुलेही होती, त्यात सगळयात लहान १३ वर्षीय युसुफ मुनीर खान होता
accident
accidentesakal

गोरेगाव - खोपोलीत अपघाताचे गांभीर्य आधी गोरेगावात कोणाच्या लक्षातच आले नाही. मात्र अपघाताची भीषणता कळल्यावर सर्वाचा थरकाप उडाला. साऱ्या गोरेगावावर शोककळा पसरली.मृतांचे नातलग तर काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.

अपघाताग्रस्त खाजगी बस मधील बाजी प्रभु वादक गटाचे झांज पथक पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते. नेहमी हे पथक गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थ नगरच्या प्रबोधनकार क्रीडाभवन परिसरात सराव करायचे. बसमध्ये या पथकातील मुलं - मुली व तसेच पथकाबहेरीलही काही मुलं होती.

बहुतेक मुलं ही गोरेगावात राहणारी आहेत. या पथकात खोपोलीतील २ मुलं होती त्यांना उतरवण्याकरिता बस त्या मार्गावर गेली होती तिथे हा भीषण अपघात झाला. या पथकात किशोरवयीन मुलेही होती, त्यात सगळयात लहान १३ वर्षीय युसुफ मुनीर खान होता.

या घटनेने गोरेगावात सर्वत्र शोककळा पसरली. ज्या मैदानात ही मुलं सराव करायची त्या जागेवर भयानक शुकशुकाट पसरला.

नागरी निवारा येथील अथर्व कांबळे याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती व तो महाविद्यालयीन जीवनाची स्वप्ने पहात होता. तो या घटनेत गंभीर जखमी झाला असून तेथीलच १५ वर्षीय राहुल गोठल हा मृत्युमुखी पडला आहे. अथर्वचे शेजारी अक्षय गांगुर्डे यांनी ही माहिती दिली.

मरण पावलेला सतीश धुमाळ (वय २४) हा पथक प्रमूख होता. त्याचा मित्र मल्हार फडके याने सांगीतले की, या घटनेत जखमी झालेला चंद्रकांत घुडे (मल्हारचा जवळचा मित्र) याने सकाळी मला या घटनेबाबत माहिती दिली. मात्र त्याने फार काही न सांगता फक्त अपघात झाल्याचे मोघम सांगितले. त्यामुळे दुचाकीचा अपघात झाल्याचे मला वाटले.

परंतू या अपघाताची संपूर्ण बातमी कळताच थरकाप उडाला आणि सतीश धुमाळ याचा मृत्यु झाला असल्याचे कळताच आधी विश्वासच बसला नाही. सतीशच्या सहवासातील सगळ्या स्मृती एक एक करून डोळ्यासमोर आल्या व काय बोलावे तेच सुचेना.

accident
Jalgaon Crime News : अमळनेर येथील तरुणास चौघांकडून बेदम मारहाण

सतीशच हसणं, भेटला की हाथ मिळवणं, एकत्र सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होणं हे सगळं अचानक डोळ्यासमोर आलं आणि गलबलून आले. एकाच वेळी गोरेगावातील एवढी लहान मुले अपघातग्रस्त होणे, ही सकाळीच आलेली बातमी गोरेगावकरांसाठी फार भयानक ठरली." असे तो म्हणाला.

गोरेगाव पश्चिमेच्या बेस्ट कॉलनी मधील अनिकेत जगताप याचा देखील या अपघातात मृत्यु झाला. रुग्णालयात त्याचा मृतदेह घेण्यासाठी जाताना त्याच्या पालकांना अश्रू आवरत नव्हते. अनिकेतचा मृतदेह रुग्णालयातून गोरेगावात न आणता त्याच्या गावी नेला जाणार आहे असे अनिकेत चा मित्र आदित्य पन्हाळे याने सांगितले.

सुनील प्रभू तुळशीराम शिंदे यांचे मदत कार्य

या अपघातात मृत व जखमी झालेल्यांपैकी अनेक जण हे शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्या दिंडोशी (गोरेगाव पूर्व) मतदारसंघातील आहेत. अपघात झाला त्यावेळी प्रभू वज्रमूठ सभेनिमित्त नागपूरला होते. मात्र अपघाताची बातमी कळतात त्यांनी आपल्या विभागातील नगरसेवक तुळशीराम शिंदे यांना त्याची माहिती देऊन मृतांच्या व जखमींच्या नातलगांना सहाय्य करण्यास सांगितले.

accident
Mumbai Pune Highway Acident : CM शिंदेंकडून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

त्यानुसार शिंदे यांनी गोरेगाव येथून मृत व जखमींच्या काही नातलगांना घेऊन प्रथम जखमीना ठेवलेले एमजीएम हॉस्पिटल व नंतर तेथून खालापूर गाठले. तेथे जाऊन त्यांनी जखमींना सर्व प्रकारचे सहाय्य करणे,

तसेच मृतदेहांचे सर्व सोपस्कार पूर्ण करून मृतदेहांचा ताबा नातलगांना देणे, ज्या मृतांचे नातलग येण्यास उशीर होत असेल त्यांचे मृतदेह शवागारात ठेवणे, मृतदेह मुंबईला आणून त्यांच्या अंत्यसंस्कारांची व्यवस्था करणे आदी सर्व बाबतीत नातलगांना सहाय्य केले.

वीर बाजीप्रभू ढोल पथकाचे हे सदस्य काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यास पुण्यात गेले होते. तेथून परत येताना हा अपघात झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

अपघातानंतर मृतदेह मुंबईला नेईपर्यंत स्थानिक प्रशासनाने तसेच रुग्णवाहिका चालकांनी चांगली मदत केल्याचेही ते म्हणाले. काही घरातील तर दोन दोन सदस्य या अपघातात मृत झाल्याने सर्व नातलगांची अवस्था बिकट झाल्याचेही ते म्हणाले.

accident
Mumbai Pune Highway Accident : आम्ही जखमींना खांद्यावर उचलून...; पोलिसांनी सांगितली भीषणता

मनमिळाऊ स्वभावाची मुले

अठ्ठावीस वर्षीय पूनम खडताळे ही देखील या पथकातील एक सक्रिय सदस्य होती. गेले काही महिने तिचा या पथकातील सर्वच मनमिळाऊ सदस्यांबरोबर कार्यक्रमांमध्ये सहभाग होता. वेगवेगळी वाद्ये घेऊन वादनाचे काम करणारे हे तरुण कोठेही कार्यक्रमासाठी एकत्रित जाऊन, एकमेकांना मदत करत,

एकमेकांना साथ देत कार्यक्रम करीत असत. त्यामुळे त्यांची केमिस्ट्री चांगली जमली होती असे पुनमने सांगितले. गेले काही महिने कार्यक्रम नसल्यामुळे आम्ही एकत्र नव्हतो, मात्र दूरध्वनीवरून संपर्क होताच. ही सारी लहान मुले होती आणि स्वतःच्या हिमतीवर धडपड करत होती.

त्यांचे स्वभावही खूप छान होते त्यामुळे काम करताना वेगळीच मजा येत होती. आज असे काही होईल असे आम्हाला वाटलेच नव्हते. खरं सांगायचे तर आमच्यातील कोणीही आता बोलण्याच्याही मनस्थितीत नाही, असेही पूनमने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com