Mumbai Accident : वरळीत निर्माणाधिन इमारतीतून मोठी विट पडून दोघांचा मृत्यू

मुंबईच्या वरळी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून मोठी विट पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री नोंदवण्यात आली आहे.
death
deathsakal

मुंबई - मुंबईच्या वरळी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून मोठी विट पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री नोंदवण्यात आली आहे. मुंबईतील वरळी भागात रात्री ९.४० वाजता एका बांधकामाधीन इमारतीच्या ४२व्या मजल्यावरून मोठी वीट पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. इम्रान आणि शब्बीर असे मृतांचे नाव असून ते एक्सपोर्ट कंपनीत काम करत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.

मृतदेह महापालिकेच्या नायर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. इमारतीचे काम सुरू असताना सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली होती. तसेच निष्काळजीपणामुळे दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत का? याचा तपास करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com