esakal | वाहतूक पोलिसाला फरफटत नेणार्‍या हुंदाई कारचालकास अटक | Accident
sakal

बोलून बातमी शोधा

Driver arrested

वाहतूक पोलिसाला फरफटत नेणार्‍या हुंदाई कारचालकास अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कर्तव्य बजाविणार्‍या वाहतुक विभागाचे (traffic police) पोलीस नाईक विजयसिंह कृष्णराव गुरव (vijay singh gurav) यांना आझादनगर ते डी. एन. नगरदरम्यान कारच्या बोनेटवर फरफरट नेणार्‍या (Accident) हुंदाई कारचालकास (driver arrest) अखेर डी. एन नगर पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा: दादर : ५१ वर्षांच्या इंजिनिअरची आत्महत्या; ३६ व्या मजल्यावरुन उडी

सोहेल सुनिल कथुरिया असे या आरोपी चालकाचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डी. एन नगर वाहतूक पोलीस चौकीचे पोलीस नाईक विजयसिंह गुरव हे गुरुवारी सकाळी आझादनगर येथे कर्तव्य बजावित होते. यावेळी एक कारचालक विरुद्ध दिशेने कार घेऊन येताना त्यांना दिसला. त्यामुळे कारचालकावर कारवाई करण्यासाठी ते पुढे गेले.

त्यांनी कारचालकाला थांबण्याचा इशारा केला. कार थांबविल्यानंतर त्याने कारबाहेर येण्यास नकार दिला, तो पळून जाण्याची शक्यता असल्याने विजयसिंह हे कारच्या बोनेटवर बसले. त्यानंतर तो त्यांना बोनेटवरच घेऊन आझादनगर येथून डी. एन नगर वसाहतीत घेऊन आला. तिथे काही लोकांनी ही कार अडविली. मात्र काही वेळानंतर तो कार घेऊन पळून गेला होता. या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ३५३, २७९, ३३६, १८४ भादवी आणि मोटार वाहतूक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

हेही वाचा: परमबीर सिंह यांना तात्पुरता दिलासा ; मुंबई पोलिसांची हायकोर्टात माहिती

गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा सोहेल कथुरिया याला पोलिसांनी अंधेरीतील आंबोली परिसरातून अटक केली. सोहेल या हाच परिसरात राहत असून त्याच्या वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. कारवाईसह गर्दीला पाहून तो प्रचंड घाबरला. त्यामुळे तो कारबाहेर आला नाही. याच गुन्ह्यांत रात्री अटक केल्यानंतर त्याला शुक्रवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

loading image
go to top