Mumbai Accident : वरळी सिफेस अपघात प्रकरणी आरोपी सुमेर मर्चंटला 22 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

वरळी सिफेसवर रविवारी झालेल्या अपघाता प्रकरणी आरोपी वाहनचालक सूमेर मर्चंटला मुंबईतील दंडाधिकारी न्यायलयाने 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
police custody
police custodysakal
Summary

वरळी सिफेसवर रविवारी झालेल्या अपघाता प्रकरणी आरोपी वाहनचालक सूमेर मर्चंटला मुंबईतील दंडाधिकारी न्यायलयाने 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुंबई - वरळी सिफेसवर रविवारी झालेल्या अपघात प्रकरणी आरोपी वाहनचालक सूमेर मर्चंटला मुंबईतील दंडाधिकारी न्यायलयाने 22 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वरळी सी फेस येथे रविवारी सकाळी 42 वर्षीय राजलक्ष्मी राजकृष्णन या महिलेचा सुमेर मर्चंटच्या गाडीने धडक दिल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 23 वर्षीय चालकाला अटक केली होती.

घटनाक्रम

भरधाव वेगाने येणाऱ्या मोटरगाडीने दिलेल्या धडकेत 42 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. राजलक्ष्मी राजकृष्णन असे महिलेचे नाव आहे. या अपघातात गाडीचा चालकही जखमी झाला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून 23 वर्षीय सुमेर मर्चंट या चालकाला अटक केली आहे. त्यालाही अपघातात दुखापत झाली आहे. सुमेरच्या घरी शनिवारी रात्री मित्रांची पार्टी झाली होती. त्यानंतर तो मित्राला सोडायला शिवाजी पार्क येथे गेला असता त्याने हा अपघात केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सुमेर मर्चंट हा ताडदेव येथे आपले पालक आणि धाकट्या भावासोबत रहात असून त्याचे पालक हिमाचल प्रदेशात गेल्याने त्याने आपल्या घरी मित्रासाठी पार्टी ठेवली होती. वाहन चालविताना सुमेर मर्चंट याने मद्यप्राशन केले होते का हे अजून कळलेले नसून त्याचे रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

police custody
Ramdas Athawale : चवदार तळे सत्याग्रह हा विश्वाला समतेची प्रेरणा देणारा मानव मुक्तीचा संग्रम

आयटी कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी

राजलक्ष्मी राजकृष्णन मुंबईतील आय टी कंपनीत सीईओ पदावर कार्यरत होत्या.त्या माटुंगा पूर्वेकडील बालाजी गार्डन टॉवर येथील सातव्या मजल्यावर राहतात, त्यांनी अलीकडेच टाटा मॅरेथॉनमध्येही भाग घेतला होता, रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडल्या. वरळी सी फेसवर चालत जात असताना सकाळी साडेसहाच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार राजलक्ष्मी यांना धडक देत दुभाजकावर आदळली. या धडकेत त्या दूरवर फेकल्या गेल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याने स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना नायर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले. यामध्ये गाडीचाही चुराडा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com