Mumbai News : विमानात धूम्रपान करणाऱ्या आरोपीची न्यायालयाकडून जामीनावर सुटका

रमाकांत द्विवेदी या अमेरिकन नागरिकाला सोमवारी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.
Court Order
Court Orderesakal
Summary

रमाकांत द्विवेदी या अमेरिकन नागरिकाला सोमवारी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला.

मुंबई - एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये धूम्रपान आणि क्रूशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 34 वर्षीय रमाकांत द्विवेदी या अमेरिकन नागरिकाला सोमवारी मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. एअर इंडियाच्या एआय 130 फ्लाईटने 10 मार्चला लंडनवरून भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता मुंबईला जाण्यासाठी उड्डाण केलं. परंतु काही वेळाने विमानाच्या टॉयलेटमधून धूर येताना दिसला तसेच या धुरामुळे अलार्म वाजू लागला.

शिल्पा मिश्रा यांनी इतर क्रू मेंबर्सच्या मदतीने स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडला. तेव्हा आरोपी रमाकांत द्विवेदी आतमध्ये धूम्रपान करत होता. त्याला धूम्रपान करण्यापासून रोखण्यात आलं. तसेच याबाबत पायलटलादेखील माहिती देण्यात आली. सर्वांनी आरोपीला समजावलं, परंतु तो क्रू मेंबर्ससोबत वाद करत हातपाई करू लागला. त्यानंतर क्रू मेंबर्सने त्याच्या हातातील सिगारेट आणि लायटर हिसकावून त्याला त्याच्या सीटवर बसवलं.

Court Order
Mumbai News : गोखले उड्डाण पुलाचे १६ गर्डर हटविले

प्रवाशाची मुजोरी

त्यानंतर आरोपी पुन्हा सीटवरून उठला आणि त्याने विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यामुळे विमानातील प्रवासी घाबरले. इतर प्रवाशांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु द्विवेदीने त्या प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर क्रू मेंबर्सनी इतर प्रवाशांच्या मदतीने द्विवेदीला पकडलं आणि त्याचे हात बांधून पुन्हा सीटवर बसवलं. परंतु द्विवेदी थांबला नाही, त्याने पुन्हा आदळआपट सुरू ठेवली. 11मार्चला विमान मुंबई विमानतळावर पोहोचलं. त्यानंतर क्रू मेंबर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी द्विवेदीला पकडून पोलिसांच्या हवाली केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com