मुंबई : अतिरिक्त ठरलेल्या अर्धवेळ ग्रंथपालांचे होणार पूर्णवळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबई : अतिरिक्त ठरलेल्या अर्धवेळ ग्रंथपालांचे होणार पूर्णवळ

मुंबई : राज्यातील अनुदानित, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मागील काही वर्षांत अतिरिक्त ठरलेल्या अर्धवेळ ग्रंथपालांचे लवकरच इतर शाळांमध्ये समायोजन केले जाणार आहे. त्यासाठी त्यांचे उन्नयन करून त्यांना पूर्णवेळ ग्रंथपालांचा दर्जा दिला जाणार आहे. यासाठी शिक्षण संचालनालयाने दोन शाळांना एकत्र करून या ग्रंथपालांचे समायोजन करण्यासाठीचा नवा फार्म्युला तयार केला आहे.

शालेय शिक्षण विभागाने मागील काही वर्षांपूर्वी विद्यार्थी संख्येनुसार अर्धवेळ ग्रंथपालांचे निकष ठरवले होते. त्यात शेकडो अर्धवेळ ग्रंथपाल हे अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे समायोजन करण्यासाठी एक हजार पेक्षा कमी विद्यार्थी संक्ष्या असलेल्या दोन शाळांना एकत्र करून त्या ठिकाणी अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपालांचा दर्जा दिला जाणार आहे.

हेही वाचा: औरंगाबाद : मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्यांवर निलंबनाचा बडगा

यासाठी १ हजार ते ५०० विद्यार्थी संख्या असलेल्या आणि अर्धवेळ ग्रंथपाल पद मंजूर असलेल्या १ ते ५ किमी अंतरातील दोन शाळा यांची माहिती शिक्षण संचालनालयाकडे सादर करण्यासाठी शिक्षण संचालक महेश पालकर यांनी आवाहन केले आहे.

loading image
go to top