मुंबईत गेल्या 24 तासात 993 नवीन कोरोना रुग्णांची भर; तर 680 जण कोरोनामुक्त 

मिलिंद तांबे
Saturday, 31 October 2020

मुंबईत आज 993 रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 2,57,500 झाली आहे. आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 10,250 वर पोचला आहे.

मुंबई : मुंबईत आज 993 रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 2,57,500 झाली आहे. आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 10,250 वर पोचला आहे. याशिवाय आज 680 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 2,27,822 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे. 

कांदा साठवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; शेतकरी, व्यापाऱ्यांना अनेक अडचणी

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत 164 दिवसांवर गेला आहे; तर 30 ऑक्‍टोबरपर्यंत एकूण 15,26,460 कोविड चाचण्या करण्यात आल्या. 24 ऑक्‍टोबर ते 30 ऑक्‍टोबरदरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.42 इतका आहे. मुंबईत आज नोंद झालेल्या 32 मृत्यूंपैकी 21 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 22 पुरुष, तर 10 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 32 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षांखालील होते, 7 रुग्ण 40 ते 60 वर्षांदरम्यान होते, तर 23 रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते.

मुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज 

मुंबईत 609 इमारती आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्या असून, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 7,479 इतकी आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात 7,798 अतिजोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल करण्यात येणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असून, आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 755 अतिजोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल झाले. 

Mumbai adds 993 new corona patients in last 24 hours While 680 are coronal free

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai adds 993 new corona patients in last 24 hours While 680 are coronal free