esakal | मुंबईकरांना तूर्तास फायझरची लस नाही मिळणार कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

BMC-Chahal

मुंबईकरांना तूर्तास फायझरची लस नाही मिळणार कारण...

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी मुंबई महापालिकेने निविदा काढल्या (mumbai vaccine procurment) आहेत. या निविदेला फायझर (Pfizer) कंपनीने प्रतिसाद दिल्याचा दावा मुंबई महापालिकेचे (bmc) आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला होता. पण फायझर कंपनीने स्टेटमेंट जारी करुन, अशा कुठल्याही निविदेला प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Pfizer denies BMC Commissioner chahal claims to bid for providing Pfizer vaccine to mumbai)

"आम्ही तसेच आमच्याशी संबंधित असलेल्या जगातील कुठल्याही कंपनीला फायझर लसीची आयात, वितरण, मार्केटिंग करण्याचा अधिकार नाहीय" असे फायझर कंपनीने स्पष्ट केले आहे. कोरोना संकटाच्याकाळात फायझर जगभरात लसींचा पुरवठा करताना फक्त केंद्र सरकारशी डील करतेय, असे फायझरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. भारतात लसी उपलब्ध करुन देण्यासाठी फायझरची केंद्र सरकार बरोबर चर्चा सुरु आहे.

हेही वाचा: मोठी बातमी: मविआमध्ये मतभेद, काँग्रेस सरकारमधून बाहेर पडणार?

मुंबई महापालिकेच्या लस खरेदीच्या प्रस्तावाला आठ कंपन्यांनी प्रतिसाद दिला. यात सात कंपन्यांनी स्पुटनिक व्ही लसीचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे तर एक कंपनी फायझर असल्याचे इक्बाल सिंह चहल यांनी म्हटले होते.

फायझरने भारतासमोर ठेवल्या अटी

अमेरिकेच्या फायझरने (Pfizer) यावर्षी कोरोना लसीचे ५ कोटी डोस देण्यास तयारी दर्शवली आहे. पण यासाठी काही अटीही ठेवल्या आहेत. एक कोटी डोस जुलैमध्ये, एक कोटी ऑगस्टमध्ये, सप्टेंबर महिन्यात दोन कोटी तर ऑक्टेबरमध्ये पुन्हा राहिलेले एक कोटी डोस देण्यास फायझर तयार आहे. जगभरात फायझरच्या १४.७ कोटी डोसचे वाटप करण्यात आलं आहे. आणि आतापर्यंत या लसीचे कोणतेही दुष्परिणाम समोर आलेले नाहीत.

फायझरच्या अटी -

१. फक्त भारत सरकारसोबत कंपनी चर्चा करेल. तसेच भारत सरकारलाच डोसचे पैसे फायझर इंडियाला द्यावे लागतील.

२. खरेदी केलेल्या डोसचे वितरण स्वत: भारत सरकारला करावे लागेल.

३. लस मिळविण्यासाठी भारत सरकारला नुकसानभरपाईचा एक करार करावा लागेल. यासाठी फायझर कंपनीने आवश्यक कागदपत्रेही पाठवली आहेत.

४. अमेरिकेसहित ११६ देशांशी अशा प्रकारचा करार करण्यात आल्याचे फायझरचे म्हणणे आहे.

हेही वाचा: उद्धव ठाकरे हे कोकणात पिकनिकला गेले होते? - नारायण राणे

मुंबईकरांसाठी एक कोटी लस विकत घेण्यासाठी महापालिकेच्या GEI ला आठ कंपन्यांनी प्रतिसाद दिला. एक निविदा फायझर/अस्त्राझेनेकाची तर सात निविदा स्पुटनिक व्ही लसीसाठी होत्या. कंपन्यांना कागदपत्रांची पुतर्ता करता यावी, यासाठी महापालिकेने आठवड्याभरासाठी निविदांनी मुदत वाढवली आहे.