esakal | मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील समस्यांच्या निषेधार्थ आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Shramjivi union strike

मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील समस्यांच्या निषेधार्थ आंदोलन

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार: मुंबई -अहमदाबाद (mumbai-Ahmadabad) राष्ट्रीय महामार्गावर (national highway) जागोजागी पडलेले खड्डे (potholes) व सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या (traffic jam) निषेधार्थ श्रमजीवी संघटना (Shramjivi Union) यांच्या तर्फे आज महामार्गावरील 14 ठिकाणी आंदोलन (strike) करण्यात आले. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या .

हेही वाचा: कार्यकर्ते महिलांवर अत्याचार करणार नाहीत; नवाब मलिक हमी देतील का ?- शीतल देसाई

राष्ट्रीय महामार्ग हा अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर निर्माण होत असलेल्या समस्येकडे महामार्ग प्राधिकरण व आयआरबी यांच्या मार्फत दुर्लक्ष केले जाऊ लागले आहे. याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. वाहतूक कोंडी व रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे विशेष करून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिकच तोंड द्यावे लागत आहे. यासाठी आज संघटनेतर्फ एकाचवेळी वसई तालुक्यात ससुनवघर, चिंचोटी, शिरसाड , पेल्हार, सकवार खानिवडे टोल नाका, पालघर तालुक्यात वरई फाटा, मस्तान नाका, चिल्हार फाटा, सोमटा,डहाणू तालुक्यात दापचरी, तलासरी तालुक्यात आमगाव आणि अच्छाच 14 ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.

यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. वसईतील चिंचोटी उड्डाणपुलाजवळ सुद्धा मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले होते. तर वसई तालुक्याच्या प्रवेशद्वार असलेल्या मालजी पाडा येथील उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणत खड्डे असल्याने त्याठिकाणीही आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा , सरचिटणीस विजय जाधव, पालघरजिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांच्या सह अनेक तालुक्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर विविध समस्यां बाबतचे निवेदन संघटनेच्यावतीने आयआरबीच्या अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आले.

हेही वाचा: सामान्यांच्या गळ्यात कर्जे, बँकांपासून सावध रहा; कर्मचारी संघटनेचे आवाहन

"चिंचोटी उड्डाण पुलाच्या जवळ दररोज वाहतुकी कोंडी होत असते. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. याचा फटका जास्त करून जवळच्या भागात राहत असलेल्या नागरिकांना बसत आहे. तसेच आजारी रुग्णांनाही येथून उपचारासाठी नेण्यात अडचणी येत आहेत."

- हेमंत बात्रा ,आंदोलक

"मुबई अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा येथील उड्डाण पुलावर खड्डे झाले आहेत परंतु सतत पडत असलेल्या पावसामुळे काम करण्यास मिळत नाही. पाऊस थांबल्या बरोबर हे खड्डे भरण्यात येणार आहेत."

-अमित साठे , मॅनेजर आयआरबी

loading image
go to top