esakal | कार्यकर्ते महिलांवर अत्याचार करणार नाहीत; नवाब मलिक हमी देतील का ?- शीतल देसाई
sakal

बोलून बातमी शोधा

Sheetal-Gambhir-Desai

कार्यकर्ते महिलांवर अत्याचार करणार नाहीत; नवाब मलिक हमी देतील का ?- शीतल देसाई

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : कोरोना (corona) जाईपर्यंत गर्दीचे कार्यक्रम (crowd events) पक्ष करणार नाही, अशी हमी देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नबाब मलिक (nawab malik) हे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते महिलांवर अत्याचार (misbehaving with woman) करणार नाहीत, याची हमी देतील का, असा बोचरा प्रश्न भाजप मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर देसाई (sheetal desai) यांनी विचारला आहे.

हेही वाचा: मराठी पाट्यांसाठी वसईत धार्मिक स्थळांना पाठवल्या नोटीसा

नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्ह्यात महिला सरपंचाला मारहाण केल्याचा व्हिडियो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाला होता. या कार्यकर्त्यांना पक्ष पाठीशी घालत असल्याचा आरोपही विरोधी पक्ष करीत आहेत. त्यासंदर्भात श्रीमती देसाई यांनी वरील वक्तव्य केले आहे. यापूर्वीही अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते असल्याने त्यांच्या नेत्या-कार्यकर्त्यांना वाटेल ते गुन्हे करायचा परवाना मिळाला आहे का, अशी जळजळीत टीका भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनीही केली होती.

तर कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेमुळे उत्सवकाळात लोकांनी गर्दी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यावर राजकीय कार्यक्रमांना होणारी तुफान गर्दी कोरोनाप्रूफ असते का, अशी टीका त्यांच्यावर झाली होती. त्यामुळे नबाब मलिक यांनी नुकतेच वरीलप्रमाणे विधान केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना श्रीमती देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर कोरडे ओढले आहेत. कोरोनापासून बचाव करणे हे महत्वाचे आहेच. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जेव्हा महिलांवर अत्याचार करतात तेव्हा शेत खाणाऱ्या या कुंपणापासून महिलांना कसे वाचवायचे हे देखील तितकेच महत्वाचे आहे, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: टेक्सल इंडस्ट्रीज Rights Issue च्या Equity Shares चे मूल्य

कोरोनाप्रमाणेच स्वपक्षाच्या गुंडांपासून आपल्या भगिनींना वाचविण्याची काळजीही प्रवक्त्यांनी घेतली पाहिजे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आणलेल्या महिला धोरणाला यशस्वी करण्यासाठी महिला सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे हे देखील मलिक यांनी ध्यानात ठेवावे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यात महिलांवर अत्याचार करतात हे पाहून ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आग्रही असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मनाला किती वेदना होत असतील याचाही विचार मलिक यांनी करावा, असेही देसाई यांनी सुनावले आहे.

loading image
go to top