

Mumbai-Ahmedabad Bullet Train
ESakal
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी डहाणू ते अंबेसराईतील १३२ केव्ही ट्रान्समिशन वाहिनी उभारण्यासाठी ८४७ खारफुटींची कत्तल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (एमएसईटीसीएल) महाट्रान्सकोने उच्च न्यायालयात याचिका केली आहे; मात्र अशा प्रकल्पांसाठी झाडे किंवा खारफुटी तोडण्याची परवानगी घेतली जाते. परंतु, पुन्हा पुनर्रोपण केलेली झाडांची पाहणी, देखरेख केली जात नाही, अशा शब्दांत न्यायालयाने संबंधित प्राधिकरणाच्या कानउघाडणी केली.