Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

विक्रोळीत ३५० टनांचा कटरहेड शाफ्टमध्ये यशस्वीपणे उतरवून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या २१ किमी भुयारी मार्गातील समुद्राखालील बोगद्याच्या प्रत्यक्ष खोदकामाला वेग; देशातील अत्याधुनिक अभियांत्रिकी क्षमतेचे प्रदर्शन
Engineering Marvel: 350-Ton TBM Cutterhead Lowered into Vikhroli Shaft

Engineering Marvel: 350-Ton TBM Cutterhead Lowered into Vikhroli Shaft

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भुयारी कामात महत्त्वाची प्रगती झाली असून विक्रोळी येथे टनेल बोरिंग मशीनचा (टीबीएम) पहिला कटरहेड यशस्वीपणे शाफ्टमध्ये उतरविण्यात आला आहे. तब्बल ३५० टन वजनाचा आणि १३.६ मीटर व्यासाचा हा कटरहेड देशातील अत्याधुनिक अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक मानला जात आहे. या प्रक्रियेमुळे मुंबईतील बहुप्रतीक्षित समुद्राखालील बोगद्याच्या प्रत्यक्ष खोदकामाला गती मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com