

Accident
sakal
मनोर, ता. २१ (बातमीदार) मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाघोबा खिंड परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेनंतर चालक फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या अपघाताच्या काही तास आधी महामार्गावर चार-पाच वाहनांची धडक होऊन विचित्र अपघात झाला होता. त्यात सुदैवाने कोणती जिवितहानी झाली नव्हती, मात्र अपघातानंतर मोठी वाहतूक कोंंडी झाली होती.