Mumbai News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठे भगदाड! प्रवाशांचा जीव धोक्यात, वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

Mumbai-Ahmedabad Highway: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठे भगदाड पडले आहे. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Mumbai-Ahmedabad Highway pothole

Mumbai-Ahmedabad Highway pothole

ESakal

Updated on

कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपुलावर अवघ्या चार दिवसांत पुन्हा मोठा आरपार खड्डा पडल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार खड्डे पडत असल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ६) महामार्ग प्राधिकरणाने आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांची टीम घटनास्थळी बोलावून पुलाची तांत्रिक पाहणी करून घेतली. तज्ज्ञांकडून लवकरच अहवाल सादर करण्यात येणार असून, त्यानुसार कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com