

silver transporting vehicle Accident
Esakal
कासा बातमीदार
मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी पुलावर शुक्रवारी (दि. १५) पहाटे भीषण अपघात होऊन ब्रिंक्स कंपनीच्या व्हॅनमधील दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.