

Tanker Accident on Mumbai-Ahmedabad Highway and Timely Action
Sakal
कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडाखडकोना मेंढवन दरम्यान गुरुवारी (ता. १७) मध्यरात्रीच्या सुमारास एलपी गॅस वाहतूक करणारा टँकर वळणावर नियंत्रण सुटल्याने कलंडला. दोन्ही वाहिनीच्या मध्ये डिव्हायडर मध्ये अडकला. टँकरमधून गॅसची कोणतीही गळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.