
मुंबई : या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान, ८९ पैकी ४९ दिवस मुंबईच्या हवेतील पीएम१०ची पातळी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकांपेक्षा जास्त होती. म्हणजेच एकूण कालावधीमध्ये ५५ टक्के दिवस हवेची गुणवत्ता पातळी निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीच्या विश्लेषणातून दिसून आली.‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अॅण्ड क्लीन एअर’ या संस्थेने या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे.