गरीब मुलांना घडवणार मुंबईची हवाई सफर

किरण कारंडे
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

मुंबई - आरे वसाहतीतील हेलिकॉप्टर दुर्घटना ताजी असतानाच शाळकरी विद्यार्थ्यांना मुंबईची हवाई सफर घडवण्याचा ध्यास भाजपच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने घेतला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वरळीतील झोपडपट्टीतील 30 मुलांना हवाई सफर घडवण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्याविषयी जागोजागी बॅनरही लावण्यात आले आहेत.

वरळी वॉर्ड क्रमांक 197 मधील मुलांचे पालक मात्र धास्तावले आहेत. भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संतोष पांडे विभागातील 8 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत हवाई सफर घडवणार आहेत. 18 डिसेंबरपर्यंत नावे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोडत पद्धतीने अंतिम 30 जणांची यादी निश्‍चित करण्यात येईल. याबाबत पांडे यांनी सांगितले की, आरेतील घटना दुर्दैवी आहे. अशा घटना मुंबईसारख्या शहरात क्वचितच घडतात. मुंबईत महालक्ष्मी येथे हेलिपॅड आहे. अनेक मुलांना आकाशात भिरभिरताना आणि उतरताना हेलिकॉप्टर दिसते; पण त्यात बसण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे 25 डिसेंबरला या मुलांना हा आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हेलिकॉप्टर राईडसाठी आतापर्यंत 150 अर्ज आले आहेत. काही पालकांनाही ही सफर घडवण्याचा मानस आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Mumbai air travel causes of poor children