मुंबईतील हवा दिल्लीपेक्षाही खराब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

मुंबई - कडाक्‍याच्या थंडीमुळे हवा खेळती न राहिल्याने मुंबई परिसरातील हवेची गुणवत्ताही ढासळत आहे. रविवारी मुंबईतील हवा प्रदूषणाची राजधानी असलेल्या दिल्लीपेक्षाही खराब होती. मालाड परिसरातील हवा सर्वाधिक प्रदूषित होती, असे निरीक्षण सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी ॲण्ड रिसर्च (सफर) या संस्थेने नोंदवले. रविवारी मुंबई आणि दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा अनुक्रमे २६३ आणि २५९ एवढा नोंदवण्यात आला.

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मुंबईसह कोकणचा उर्वरित भाग, मध्य महाराष्ट्रात गारठा निर्माण झाला आहे. थंडीमुळे हवा खेळती न राहिल्याचा फटका मुंबईतील नागरिकांना बसला. रविवारी शहरातील अनेक भागांतील हवेची गुणवत्ता ढासळल्याचे आढळले. या वातावरणामुळे श्‍वसनसंबंधित आजार वाढू शकतात, अशी भीती डॉक्‍टर वर्तवत आहेत.

ही काळजी घ्या
वृद्ध, लहान मुले, फुफ्फुसांचा त्रास असलेल्या व्यक्तींना अशा वातावरणात श्‍वसनाचा त्रास होण्याची शक्‍यता. अशा व्यक्तींनी घरातून बाहेर जाणे टाळावे. 

घरातून बाहेर पडताना नाकावर रुमाल बांधावा. 
गरम पाणी प्या.
सर्दी, खोकला अंगावर काढू नका.

श्‍वसनसंबंधित आजारांचे रुग्ण वाढले 
वाढत्या थंडीमुळे श्‍वसनसंबंधित आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. रविवारी आमच्या दवाखान्यात घसा खवखवणे आणि सर्दी व खोकल्याच्या तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्या मोठी होती, अशी माहिती वांद्रे येथील डॉ. संजीव मेहता यांनी दिली.

Web Title: Mumbai air is worse than Delhi